

Ajit Pawar lays foundation for Sant Savta Mali Hall, announces statue project to honor 12 national heroes in Baramati.
Sakal
माळेगाव : राष्ट्र पुरुषांच्या स्मृती जपण्याच्या आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने बारामती शहरात विविध १२ राष्ट्र पुरुषांचे अर्ध पुतळे उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात आणि ओळखीत भर पडणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विशेषतः यावेळी पवार यांच्या या उपक्रमाचे नागरिक व सामाजिक संस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.