बारामतीच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

Ajit Pawar Deputy Chief Minister of Maharashtra
Ajit Pawar Deputy Chief Minister of Maharashtrasakal

बारामती : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना शासकीय दरामध्ये दर्जेदार सेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

येथील शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) उदघाटन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ऑनलाईन पध्दतीने झाले, त्या प्रसंगी अजित पवार बोलत होते.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री अमित देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आयुक्त विरेंद्र सिंह, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. संतोष भोसले, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे, संभाजी होळकर, सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, येथे असलेल्या शासकीय तसेच खासगी आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणामुळे बारामती व परिसरातील नागरिकांचा फायदा होणार आहे. भारतीय आयुर्वेद मानकानुसार बारामतीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयही उभारण्यात येत आहे.

येथील आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवाढ करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविडपश्चात त्रास होणाऱ्यांसाठी समूपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना याचा फायदा होईल.

अमित देशमुख म्हणाले, कोरोनाच्या काळात वित्त विभागाने आरोग्यविषयक सोई-सुविधांकरिता निधी कमी पडू दिला नाही. यामुळे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व पदांच्या पदभरतीला मान्यता मिळाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व निवड मंडळामार्फत भरती प्रकिया राबविण्यात येत आहे. बारामतीचे वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय होईल. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के यांनी प्रास्ताविकात आढावा घेतला.

शासकीय दरात सीटी स्कॅनची सुविधा...

डॉक्टर्स फॉर यू आणि बोईंग या कंपनीच्या वतीने बारामतीच्या मेडीकल कॉलेजला सीटी स्कॅन मशीन देण्यात आले आहे. शासकीय दरात येथे सीटी स्कॅन केला जातो. कोविड पॉझिटीव्ह रुग्णांचा सिटी स्कॅन मोफत केला जात असून गरजूंनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवारपासून (ता. 27) खालील सेवा रुग्णांना मिळणार....

  • • त्वचेचे विकार

  • • दातांचे विकार

  • • डोळ्यांचे विकार

  • • हाडांचे विकार

  • • नेत्र विकार

  • • कान, नाक व घसा या बाबतचे विकार

  • • बालकांचे विविध विकार

  • • मनोविकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com