Ajit Pawar funeral Baramati
sakal
पुणे
Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले
Ajit Pawar funeral Baramati : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या मैदानावर हास्यमुद्रेतील १२ फ्लेक्स, बॅनर आणि कटआउट लावण्यात आले. कार्यकर्त्यांना सुरुवातीला सभा वाटली, मात्र नंतर पवारांना अखेरचा निरोप देण्याची खरी घटना लक्षात आली.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा म्हटली की जोरदार तयारी, नीटनेटकेपणा आणि सभेच्या ठिकाणचे दादांचे फोटो, मोठमोठे कटआउट लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नव्हते. गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ही हास्यमुद्रेतील दादांचे भले मोठे फोटो ही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते, मात्र दादांच्या फोटोंनी गजबजलेले हे ठिकाण सभेचे नव्हे दोस्ता, तर दादांना अखेरचा निरोप देण्याचे आहे, हे सत्य सांगणाऱ्या मित्राकडे पाहताना कार्यकर्ते काही क्षण गहिवरल्याचे चित्र मैदानात दिसत होते.

