भीमा नदीवरील पुलाला अजित पवारांचे नाव

भीमा नदीवरील पुलाला अजित पवारांचे नाव

Published on

कडूस, ता. ५ : खेड तालुक्यातील सातकरस्थळ ते वडगाव पाटोळे दरम्यान भीमा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ठराव सातकरस्थळ ग्रामपंचायतीने मासिक सभेत सर्वानुमते घेतला आहे, अशी माहिती सरपंच रुतिका सातकर व माजी उपसरपंच अजय चव्हाण यांनी दिली.
अरबुजवाडी ते वडगाव पाटोळे दरम्यान भीमा नदीवर साडेसात कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामाला मंजुरी दिली होती. १२ सप्टेंबर २०२४ ला अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले होते. हा पूल चाकण एमआयडीसीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणार असून, यामुळे परिसरातील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे. या पुलाशी अजित पवार यांच्या आठवणी जोडलेल्या असून कामाच्या शुभारंभाचा टिकाव त्यांनी स्वतःच्या हस्ते मारला होता त्यामुळे त्यांचे नाव पुलाला द्यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या संचालक मंडळाच्या सभेत अजय चव्हाण यांनी मुद्दा मांडला होता. चर्चेअंती हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी सरपंच रुतिका सातकर, उपसरपंच स्वाती सातकर, माजी उपसरपंच अजय चव्हाण, मयूर जगदाळे, नीलेश आरबुज, प्रमोद सुपे, जयश्री पडवळ, नयना काळे, अमिता सातकर, वर्षा देवरे व ग्रामपंचायत अधिकारी अशोक जगताप उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com