पुणे - आरोपी सापडत नसेल तर त्याचा राग येणे व तो व्यक्त करणे सहाजिकच आहे. म्हणून कोणी स्वत:च्या घराच्या काचा फोडत नाहीत. तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा कोणाला अधिकार नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांचे नाव न घेता केले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सूतोवाच करत देत यापुढे अशा प्रकरणातून नुकसान भरपाई करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला.
ते औंध येथे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणा नंतर वसंत मोरे यांनी बसस्थानक परिसरात तोडफोड केली होती. त्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी संबंधित विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, सगळ्या राज्याच्या देखभालीची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असल्या सारखे काही जण अतिउत्साह दाखवत आहेत.
त्यांच्यावरही कायद्या प्रमाणे कारवाई केली जाईल. काही घटना घडल्यानंतर त्याचा तपास तातडीने लागण्यासाठी काही गोष्टीचे तारतम्य राज्यकर्ते, सत्ताधारी पक्षासह माध्यमे या सगळ्यांनी बाळगायला हवे. पोलिसांचा अहवाल येऊ द्यावा. त्यावेळी नेमके काय घडले हे समजेल. उतावीळपणा कोणीही करू नये असेही त्यांनी सुचवले.
पक्ष वाढ करण्याचा सर्वांना अधिकार
पुणे जिल्हयात भगवा फडकवणार याबाबतचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केले होते त्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, प्रत्येकाला आप आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. महायुतीतील मधील तीनही पक्षांनी एकजुटीने राहण्याचे ठरविलेले आहे.
कार्यकर्त्यांना कृती आणि प्रोत्साहन देण्यासाठी भगवामय पुणे जिल्हा करण्याचे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे ज्या ठिकाणी जातील तेथे पक्ष वाढीसंदर्भात बोलतील. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन महायुतीच्या माध्यमातून काम करत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पात सर्वांचा विचार
नवीन आर्थिक वर्षाचा अर्थ संकल्पात केंद्र सरकारने प्रमाणे राज्य सरकार अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सूतोवाच दिले. कामकाज सल्लागार समितीने अर्थसंकल्प सादर करण्यासंदर्भात मान्यता दिली असून तो मांडल्यावरच चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.