esakal | 'एक म्हणे पुन्हा येईन तर दुसरा म्हणे परत जाईन, पण बोलवलं कुणी'
sakal

बोलून बातमी शोधा

  ajit Pawar Criticizes Chandrakant patil and Devendra fadnavis in pune

कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काल एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी " माझ्या विरोधकांना सांगा, मी पुन्हा कोल्हापूरला चाललो आहे' असे वक्तव्य केले होते. त्यावरून पवार यांनी पाटील यांचा समाचार घेतला.

'एक म्हणे पुन्हा येईन तर दुसरा म्हणे परत जाईन, पण बोलवलं कुणी'

sakal_logo
By
अश्निनी केदारी जाधव

पुणे : "एकजण म्हणतो मी पुन्हा येईन, दुसरा म्हणतो मी परत जाईन. असे पण तुम्हाला बोलवलं कुणी होतं का,' अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शनिवारी जोरदार टोला लगाविला. "मागच्या वेळी तुम्ही फोडाफोडी केली, इतर पक्षातील आमदारांना घेताना उकळ्या फुटल्या. तेव्हा बर वाटत होत. आता कस वाटतयं, गारगार वाटतयं,' अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडविली. 

कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काल एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी " माझ्या विरोधकांना सांगा, मी पुन्हा कोल्हापूरला चाललो आहे' असे वक्तव्य केले होते. त्यावरून पवार यांनी पाटील यांचा समाचार घेतला. पवार म्हणाले," मी मात्र पुन्हा येईन असंही म्हणत नाही आणि परत जाईन असंही म्हणणार नाही. पण मी आपल काम करत राहणार, तुम्हाला जनतेने 5 वर्षाकरता निवडून दिलं आहे. आता कुणी त्यांच्याकडे काम घेऊन गेलं, तर म्हणतील मी तर परत कोल्हापूरला चाललो, अरे काय यांचं चाललयं हे समजतच नाही.''
 

मराठा आरक्षणाबाबत विचारले असता पवार म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत काहीही निर्णय घेतला की दोन मतप्रवाह दिसतात. तसेच आता हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे आत्ताच्या स्थितीत सारासार विचार करून "ईडब्ल्यूएस' आरक्षणा चा निर्णय घेतला आहे.'' तर खडसे यांच्यावर बोलताना पवार म्हणाले,"" एकनाथ खडसे ना ईडीची नोटीशीबाबत मला काही माहित नाही. बातम्या वाचून आणि पाहूनच कळले आहे,' असे सांगून त्यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. 


पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने 23 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. त्यावरून भाजपने राज्य सरकारवर टिका करीत आहे. त्यावर विचारले असता पवार म्हणाले, "समाविष्ट गावाबाबतचा हा निर्णय महापालिका निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून घेतलेला नाही. गावांचा समावेश पुणे महापालिका क्षेत्रात केला तर तेथे नियोजनबद्ध विकास होईल, या हेतूने हा निर्णय घेतला. आधीच्या सरकारने गावे समाविष्ट करताना महापालिकेला कुठे निधी उपलब्ध करून दिला होता. विरोधकांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे.''

loading image
go to top