अजितदादानी दामाजीसाठी नेहमी मदतीची भूमिका बजावली :- पाटील

अजितदादानी दामाजीसाठी नेहमी मदतीची भूमिका बजावली :- पाटील

Published on

MGV२६B१५२११
मंगळवेढा ः दामाजी कारखाना स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन करताना मान्यवर.

अजितदादांनी दामाजीसाठी
नेहमी मदत केली : पाटील

मंगळवेढा, ता. २९ ः मंगळवेढा तालुक्यातील एकमेव सहकारी संस्था चांगली चालावी, ऊस उत्पादक आणि कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक गाडा व्यवस्थित चालावा, यासाठी अजितदादा नेहमी पक्ष पार्टी न करता लक्ष ठेवून होते. दामाजी कारखान्याला त्यांनी नेहमीच मदत करण्याची भूमिका घेतली होती, अशा भावना कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल कारखाना कार्यस्थळावर शोकसभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ती बोलत होते. पाटील म्हणाले, तत्कालीन अध्यक्ष स्व. चरणूकाका पाटील यांच्या मंडळात मीही संचालक म्हणून कामकाज केले. त्यावेळी अडचणीच्या काळात स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या माध्यमातून अजितदादांकडे मदत मागण्याचा योग आला. परंतु मदत देताना ते कारखान्याची परिस्थिती कशी चालली आहे. कारखाना कसा चालवावा. कर्मचारी व उत्पादकाला कशा पद्धतीने न्याय द्यावा, यासाठी नेहमी विचारपूस करून मदत करण्याची भूमिका बजावत होते. संचालक औदुंबर वाडदेकर यांनी घडाळाच्या काट्याप्रमाणे अहोरात्र काम करणारा नेता हरवल्याची भावना व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत बेदरे, संचालक दिगंबर भाकरे, राजेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com