

Ajit pawar
esakal
डोर्लेवाडी, ता. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत आज (ता. २८) चार प्रचार सभा आयोजित केल्या गेल्या होत्या. नीरावागज येथे सकाळी दहाला होणाऱ्या पहिल्या सभेची तयारीही पूर्ण झाली होती. ग्रामपंचायत इमारतीसमोर सकाळपासून उत्साही कार्यकर्त्यांची गर्दीही झाली होती. 'दादा लवकर येणार आहेत, चला लवकर' अशी फोनाफोनी सुरू होती. मात्र, तत्पूर्वीच अजितदादांच्या अपघाताची बातमी समजली अन् सभेसाठी गर्दीने भरलेल्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली.