कळसमधील शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा
कळस, ता. ३१ ः राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे कळस (ता. इंदापूर) परिसरात शोककळा पसरली आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘‘दादा केवळ एक नेते नव्हते, तर सर्वसामान्य जनतेचे आधारवड होते,’’ अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विकासकामांत दादांचा असलेला धडाका आणि सामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी लोकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरुन निघणारी असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त होत होती. अनेकांना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, श्रीराज भरणे, आबासाहेब भरणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कर्मयोगीचे माजी संचालक विठ्ठलराव पाटील, सुरेश खारतोडे, रमेश खारतोडे, बाबामहाराज खारतोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य निवृत्ती गायकवाड, विजय खर्चे, सुनील ओमासे, विजय गावडे, विशाल राजेभोसले, सिताराम खारतोडे, बाळासाहेब भांडवलकर, लक्ष्मण खारतोडे, लतीफ मुलाणी, राजाराम खारतोडे, संतोष वायाळ यांच्यासह ग्रामपंचायत, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक - शिक्षिका, अंगणवाडी व आशा सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

