पाटण, पाटण बंद
पाटण, कोयनानगर, मल्हारपेठ बाजारपेठा बंद
अजित पवारांना श्रद्धांजली; व्यापारी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाटण, ता. २९ ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने पाटण शहरासह, नवारस्ता, कोयनानगर, मल्हारपेठ, मोरगिरी बाजारपेठेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहिली. येथील श्रीमंत नागोजीराव पाटणकर वाचनालयात सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी एकत्र येत अजित पवारांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ‘‘अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ते दूरदृष्टीचे नेते होते. पाटण तालुक्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकासकामे झाली. सत्ताकाळात पाटणला त्यांनी भरभरून निधी दिला. पाटणची भाजी मंडई, न्यायालय इमारत, पंचायत समिती इमारत आदी कामे उभारली. कार्यकर्त्यांचा आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या आठवणी निश्चितच स्मरणात राहतील.’’
विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, ‘‘राज्याच्या राजकारणात अनेकांना उभे करायचे काम अजितदादांनी केले. शेवटपर्यंत त्यांनी यशवंत विचार सोडला नाही. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे ते उभे राहायचे. दादांचा पाटणकरांशी जिव्हाळा होता. तालुक्याच्या विकासात त्यांनी योगदान दिले आहे.’’
या वेळी युवा नेते याज्ञसेन पाटणकर, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, ॲड. ए. पी. पाटील, राजाभाऊ काळे, मनोहर यादव, सुरेश पाटील, संजय इंगवले, चंद्रकांत मोरे, अशोकराव गजरे, राजेंद्र कांबळे, अनिल सुतार, संजय कांबळे, मिलन सय्यद, इरफान सातारकर यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. या शोकसभेस सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक, व्यावसायिक, व्यापारी उपस्थित होते.
तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेऊन तालुकावासीयांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. त्यामुळे सगळ्या बाजारपेठांत शुकशुकाट होता.
A01206
पाटण ः अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी बाजारपेठेत शुकशुकाट होता.
.........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

