माढयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली

माढयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली

Published on

MDH26B05062
माढा ः येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना सर्व पक्षीय नेतेमंडळी व नागरिक.‌

अजितदादांना माढ्यात
सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली

माढा, ता. २९ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अजित पवार यांना सर्वपक्षीय नेतेमंडळी व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे, प्रा. शिवाजीराव सावंत, नगराध्यक्षा मीनल साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, दादासाहेब साठे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंदराव कानडे, पंचायत समितीचे माजी सदस्य पृथ्वीराज सावंत, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, नगरसेवक आजिनाथ माळी, मुन्ना साठे, नितीन साठे, गंगाराम पवार, राहुल लंकेश्वर, भैया खरात, वंचितचे रवी सरवदे, संतोष जुगदार, दादा भांगे, शहाजी चवरे, महेश चवरे, नगरसेवक राजू गोटे, आदित्य भांगे, समर्थ भांगे, रणदिवेवाडीचे माजी सरपंच दिगंबर इंगळे, बाबा मस्के, शंभूराजे साठे, चंद्रकांत कांबळे, सचिन कांबळे, देविदास कदम यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. माढा शहर डॉक्टर असोसिएशन व इतर अनेक सेवाभावी संस्थांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.‌ यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना माजी आमदार धनाजीराव साठे व नगराध्यक्षा मीनल साठे यांचा कंठ दाटून आला.

चौकट...
घरातला माणूस गेल्याची भावना : प्रा. सावंत‌
सोनारी येथील भैरवनाथ शुगर कारखान्याच्या उभारणीत अजितदादांची आपल्याला मदत झाली. २००९ च्या विधानसभेवेळी अजितदादांशी बराच वेळ चर्चा झाली होती. पक्ष कुठलाही असला तरी अजितदादा नेहमी आपल्याशी प्रेमाने वागले. माझे बंधू वारल्यानंतर जी भावना होती तीच भावना आज मला जाणवत आहे, अशी भावना प्रा. शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com