
पुणे : कारवाईसाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर वाळूमाफिया गाडी घालतात, त्यांना मारहाण करतात. अशांची मस्ती उतरवावी लागेल. यापुढे असे प्रकार घडल्यास वाळूमाफियांवर ‘मकोका’ लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.