
माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ‘ब’ वर्ग संस्था मतदारसंघातून विजयी झालेले उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सहकाराच्या राजकारणात ते सक्रिय झाले आहेत. तसेच, उपाध्यक्षपदी सर्वसाधारण महिला राखीव गटातून विजयी झालेल्या संगीता बाळासाहेब कोकरे (पणदरे) यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ‘माळेगाव’च्या संचालिक म्हणून २५ वर्षे धुरा सांभाळली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निवडीला विरोधी गटाचे संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे तक्रार केली आहे.