पुणे : ‘‘विलंबामुळे प्रकल्पांच्या किमतीत मोठी वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते. ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावा,’’ अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिली. पुण्यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) उभारणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.