
पुणे : ‘‘पुरंदर विमानतळासाठी काहींचा विरोध होता. चर्चेतून विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार पुरंदर विमानतळासाठीचे भूसंपादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे सांगून, ‘‘विमानतळाच्या भूसंपादनासाठी गावठाणांचे संपादन करण्यात येणार नाही, मात्र वस्तीमधील अथवा शेतामधील घरे संपादित करावी लागण्याची शक्यता आहे. त्या बाधितांना योग्य तो मोबदला दिला जाईल,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.