सोमेश्वरनगर (जि. पुणे) - ‘कर्जमाफीसंदर्भात आंदोलकांशी चर्चा झाली असून, ३० जूनला कर्जमाफीचा निर्णय होईल. एप्रिलमध्ये माहिती देऊ. मात्र, शून्य टक्के व्याजाने कर्ज दिल्यावर वेळेत परतफेडीची सवय लावा. बँका अडचणीत येतात..सारखंच कर्ज माफ कसं व्हायचं? यापूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिली. आता पुन्हा लोकं म्हणतात, ‘तुम्ही सांगितलंय माफ करा.’ पण, कर्जमाफीला हजारो कोटी लागतात,’ अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.पुरंदर विमानतळाच्या बाधित शेतकऱ्यांना चांगला मोबदला देत आहोतच, पण पुढील पिढ्यांचे नुकसान नको म्हणून काही टक्के जमीन त्यांना देण्याणार असल्याची घोषणाही त्यांनी केली..सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ६४व्या गळीत हंगाम प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३१) झाला. याप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी अध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते..अजित पवार म्हणाले, ‘पुरंदरला काही हजार एकरात विमानतळ होत आहे. मलाही वाटत नाही की शेतकऱ्यांच्या जमिनी जाव्यात. बारामतीतही काही शेतकऱ्यांच्या रेल्वेसाठी जमिनी जात आहेत. विकासासाठी काही तडजोड करावी लागते. त्यामुळे पुरंदरचे नागरीकरण होईल.सोमेश्वर कारखान्यावर रस्ता रुंदीकरणासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी दुकाने हलवावी लागणार आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मोरगावकरांनीही मयुरेश्वराच्या नियोजनबद्ध विकासासाठी जागा दिली तर शंभर कोटी रुपये आणू.’.युनियनच्या नावाखाली सह्या करून चकाट्या पिटणाऱ्या कामगारांबाबत, ऊस उत्पादक ‘एआय’ शेतीकडे वळत नसल्याबद्दल, तसेच सोमेश्वर मंदिरातील गाळ्यांना भेगा पडल्याबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तर निंबूतमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतल्याबद्दल दीपक जगताप या शेतकऱ्याचे कौतुक केले.लोकं शिकल्यावर देवदर्शन कमी होईल असे वाटले होते, पण शिकली सवरलेले लोक जास्त देवदेव करतात. आम्ही पण जातो, पण अमक्या गावात गेले की पद जाते, असे सांगतात. असे काही नसतं. पंचवीस वर्षे मी पदावर आहेच की, अशी मिस्किल टिपणीही यावेळी अजित पवार यांनी केली.कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आभार मानले..‘एकरकमी एफआरपी अडचणीची’कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च, व्याज, पगार, केमिकल आदी खर्च १,५०० रुपये प्रतिटनांवर गेले आहे. आपण एफआरपी देण्यासाठी जेवढी जास्त उचल घेऊ तेवढे जास्त व्याज जाणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट करत एकरकमी एफआरपी अडचणीची असल्याचे अप्रत्यक्ष सुचविले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.