

Ajit Pawar funeral Baramati news
sakal
बारामती : …परत या दादा परत या....अजित पवार अमर रहे....एकच वादा अजितदादा....अशा दिल्या जाणा-या घोषणा....डोळयातून वाहणारे अश्रू.....चेह-यावरची कमालीची अस्वस्थता.....मन सुन्न झालेले अशा अवस्थेतील लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी (ता. 29) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने बारामती थकबली होती. आता पुढे काय....हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता. अंत्यसंस्कारासाठी केवळ बारामती व पुणे जिल्हाच नाही तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातूनही चाहते पहाटेपासूनच उपस्थित होते.