Ajit Pawar’s Guidance to Newly Elected NCP Corporators
sakal
पुणे : "नगरसेवक म्हणून काम करताना महापालिकेची प्रक्रिया, कायदे समजून घ्या. शहराच्या विकासासाठी चांगले काम करा, लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाच्या गटनेता निवडीबाबतही चर्चा झाली, त्यावेळी गटनेता निवडीचे अधिकार पक्षाच्या नेत्यांकडून पवार यांना देण्यात आले.