'त्यांचे लाड घरात करा! नाहीतर मी तळजाईवर बिबटे...' - अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawaresakal

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी शहरातील तळजाई वन उद्यानातील विविध कामांचं उद्घाटन केलं. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते. सकाळी ६.३० वाजता अजित पवारांनी तळजाई टेकडीचा फेर फटका मारला. याठिकाणी लावण्यात आलेल्या विविध झाडांची पाहाणी केली.

पुण्यात मोठ्या प्रमाणात काँक्रिटचं जंगल होत चाललंय. तळजाईला येताना रस्त्यावर कचरा दिसला. त्यामळे वसुंधरेला धोका पोहचवायचा नाही, हा निश्चय आपण केला पाहिजे, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना टोला लगावला.

अजित पवार त्यांचा कामाचा धडाक्यासाठी चर्चेत असतात. अनेकदा सकाळी ७ वाजताही ते मंत्रालयात आलेले असतात. आजही पुण्यात सकाळी ६.३० लाच पवारांनी विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपस्थिती लावली. माझ्यामुळे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना लवकर उठाव लागतं. पुण्यात बदली हवी असेल, तर हे होणारचं असं पवार म्हणाले. यावर उपस्थित सर्व अधिकाऱ्यांमध्ये हशा पिकला.

तळजाईवरती ट्रीट केलेलं पाणी आण्यासाठी निधी उपलब्ध होईल

कोरोना च्या काळात आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजनच महत्त्व कळलंय

त्यामुळे झाडं लावण्याची गरज आहे

केनिया किंवा इतर देशात पाहिल्यास वातावरणाल चालणाऱ्या वस्तू वापरल्या जातात

सर्वात मोठं प्राणी अनाथालय करतोय.. २२ कोटी रुपयांची मंजुरी त्याला मिळाली आहे.

सिंहगडला जाताना देखील e vehicle सुरू केलंय. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने धोरण केलंय.

'ते थेट कोर्टात जातात'

इथे एक रुपया चार्ज लावले तर लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली. मात्र आपला पुणेकरांचा हा स्वभाव कुठेच मिळणार नाही. पुण्यात लोकं चर्चेला येतच नाहीत, थेट कोर्टात जातात, असा टोला अजित पवारांनी लगावला. कोणी कोणत्याही पक्षाचे असेल तरी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.

'मी इथे बिबटे सोडले असते'

काही लोकं तळजाईला येताना त्यांच्य श्वानांना घेऊन येतात. मात्र तसं त्यांनी करू नये. काय लाड करायचे आहेत तर ते घरी करा. कुत्र्यांना घरी झोपवा. नाहीतर मी इथे बिबटे सोडले असते. मात्र मला नागरिकांची काळजी आहे, असं म्हणत पवारांनी कोपरखळी मारली. मला तळजाईला येता येणार नाही. मात्र इथे तुम्हाला काही वाटलं की इथे सुधारणा होत नाहीय, तर मी दर आठवड्याला पुण्यात असतो. कधीही येऊन भेटा, असं पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com