Schools In Pune | पुण्यातील शाळांचा निर्णय आज? अजित पवारांची तातडीची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar On Bullock Cart Racing

पुण्यातील शाळांचा निर्णय आज? अजित पवारांची तातडीची बैठक

राज्यातील कोरोनाची तिसरी लाट अद्याप सुरू असतानाच शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही ठिकाणचे रुग्ण कमी झाल्याने तसेच विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने घोषणा केली आहे.

मात्र, शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अद्याप शाळा सुरू करण्यास महापौरांनी नकार दिला आहे. त्यानंतर पालकमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली आहे. (Ajit pawar holds review meeting on schools reopen in pune)

राज्यातील काही ठिकाणची कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने सरकारने येत्या सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीच्या शाळा ऑफलाईन पद्धतीने भरवण्याच्या निर्णयावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडे यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. एखाद्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यास स्थानिक प्रशासन शाळा बंद करण्याचे आदेश देऊ शकतं.

पुण्यात चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२१) दिवसभरात १६ हजार ६१८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १० हजार १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील चार मृत्यू आहेत.

Web Title: Ajit Pawar Holds Review Meeting On Pune Schools Reopening Pune Corona Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ajit Pawar