
Chakan Latest News: उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आम्ही आणला होता. हा प्रकल्प पथदर्शी होता. हा प्रकल्प बदलण्याचं कारण मला कळत नाही .
पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा जुना मार्ग बदलणे मला मान्य नाही. पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्या मार्गानेच झाला पाहिजे यासाठी केंद्राशी चर्चा करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आज सांगितले.