
Medha Kulkarni: पुण्यामध्ये गुरुवारी एका नियोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अजित पवार नियोजित वेळेपूर्वीच पोहोचले. फक्त पोहोचलेच नाहीतर उद्घाटन करुन रिकामे झाले. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आमंत्रित असलेल्या इतर सन्माननीय सदस्यांना रिकाम्या हातानेच माघारी परतावं लागलं. या प्रकारामुळे खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या नियोजित वेळेपूर्वी पोहोचल्या होत्या.