पुणे - महापालिका निवडणुकीमधील सोमवारचा संपूर्ण दिवस चांगलाच गाजला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी एकीकडे चाललेली चढाओढ, तर दुसरीकडे इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने उपमुखमंत्री अजित पवार यांच्या एका भेटीसाठी गाठलेला उच्चांक. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, आमदारांचा राबता वाढत असतानाच, अचानक भाजपच्या नाराज बंडखोरांनी पवार यांचे "दार" ठोठावले.