भुईंज येथे स्व.अजितदांच्या स्मरणार्थ उपमुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा

भुईंज येथे स्व.अजितदांच्या स्मरणार्थ उपमुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा

Published on

भुईंजमध्ये उपमुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा

अजित पवारांच्या स्मृतीनिमित्त शनिवारपासून आयोजन

भुईंज, ता. ५ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीनिमित्त मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच शुभम अण्णा पवार मित्र मंडळातर्फे ‘उपमुख्यमंत्री चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक उपसरपंच शुभम पवार यांनी दिली आहे.
शनिवार (ता. सात) व रविवार (ता. आठ) या दिवशी महिला, पुरुष संघाच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा संघाचा खेळाडू म्हणून निवडले जाणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार एक रुपये, द्वितीय २१ हजार एक, तृतीय ११ हजार एक, तर चतुर्थ क्रमांकासाठी सात हजार एक रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय उत्कृष्ट रेडर, बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, उत्कृष्ट डिफेंडर यांच्यासाठी रेंजर सायकल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या स्पर्धा छत्रपती शिवाजी मैदान भुईंज येथे भरविण्यात येणार आहेत. या स्पर्धा (कै.) मंगल चाची यांच्या स्मृतीनिमित्त घेण्यात आल्या आहेत. यावेळी समस्त ग्रामस्थ मंडळ व सर्व कबड्डी खेळाडूप्रेमी यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com