

Ajit Pawar
esakal
महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्षरशः रात्रंदिवस एक करत प्रचारामध्ये जीव ओतला, पण पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. त्यामुळे महापालिकेत विरोधी पक्ष नेता पदासाठी सक्षम चेहरा देण्याचे अधिकार पवार यांना देण्याचे ठरावाद्वारे निश्चित झाले आणि पवार यांनीही अॅड.निलेश निकम यांना विरोधी पक्ष नेता करण्याचा निर्णय मंगळवारीच घेतला. त्याबद्दल पवार यांच्याशी बोलून आभार व्यक्त करण्याची संधी मात्र निकम यांना मिळालीच नाही !