
पुणे : कधी रस्त्याच्या उलट्या दिशेने वाहन चालवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करणे, कधी पदपथावर वाहन लावणे किंवा दुचाकीवर तीन जण बसणे...अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र किंवा माहिती सर्वसामान्य नागरिक थेट वाहतूक पोलिसांना पाठवू शकणार आहेत. त्यासाठी खास ‘अॅप’ तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.