Indapur PoliticsSakal
पुणे
Indapur Politics : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये पवार-भरणे - जाचक पॅनेलची आघाडी
Sugar Factory Polls : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार, दत्तात्रेय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या जय भवानी माता पॅनेलने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रेय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानी माता पॅनेल ने पहिल्या फेरीमध्ये मतमोजणीमध्ये आघाडी घेतली आहे.