

Political Succession in Baramati: Jay Pawar Backs Sunetra Vahini for 2029
esakal
माळेगाव : “अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी जनतेची प्रबळ इच्छा होती. मात्र त्यांच्या अचानक अपघाती जाण्याने सर्वांच्याच अपेक्षांवर पाणी फिरले. आता २०२९ मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनीच मुख्यमंत्रीपदासाठी बारामतीतून निवडणूक लढवावी, अशी जनतेची भावना आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार आहे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते जय पवार यांनी स्पष्ट केली.