कामाचा माणूस कायम स्मरणात

कामाचा माणूस कायम स्मरणात
Published on

कामाचा माणूस कायम स्मरणात

कार्यकर्त्याला कायमच ताकद देण्याचा प्रयत्न अजितदादा करत असत. कितीही छोटा कार्यकर्ता असला आणि तो काम करत असेल तर दादा त्याला कधीच विसरत नसत. अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत. प्रसंग कोणताही आला तरी त्याला मदतीची त्यांची भूमिका कायमच होती, त्यामुळेच या राज्यात लाखो कार्यकर्ते दादांच्या एका शब्दावर काहीही करण्यास तयार असत. आपला कार्यकर्ता कायमच सर्वार्थाने कशी प्रगती करेल, यासाठी त्यांची कायम धडपड राहिली. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला विविध पदांवर काम करण्याची संधी देणे, हे त्यांच्या मोठेपणाचे प्रतीक होते. त्यांनी दिलेली संधी हीच माझ्या सार्वजनिक जीवनाची खरी ताकद ठरली.

- जय पाटील,
नगरसेवक, बारामती नगरपरिषद
माजी उपनगराध्यक्ष, बारामती नगर परिषद

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, ही वेदनादायी वस्तुस्थिती स्वीकारणे आजही कठीण वाटते. मात्र त्यांनी उभारलेली विकासाची परंपरा, कार्यकर्त्यांवर ठेवलेला विश्वास आणि समाजासाठी केलेले कार्य कायम प्रेरणा देत राहील. प्रामाणिक, निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्त्याला संधी देणारे नेतृत्व म्हणून अजितदादा सदैव स्मरणात राहतील.
माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर अजितदादांनी माझ्यावर विश्वास ठेवला. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तांदूळवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच झाल्यानंतर त्यांची भेट घेतली. त्यांनी गावाच्या विकासासाठी भरीव निधी दिला आणि माझ्या कामाची दखल घेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. सन २०१२ मध्ये तांदुळवाडीचा बारामती नगरपरिषदेत समावेश झाल्यानंतर नगरसेवक म्हणून काम करण्याची संधीही त्यांनीच दिली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे परिसराचा कायापालट झाला.
त्यानंतर आरोग्य सभापती, उपनगराध्यक्ष आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती शहराध्यक्षपदाची जबाबदारी देत त्यांनी माझ्यावर सातत्याने विश्वास व्यक्त केला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला विविध पदांवर काम करण्याची संधी देणे, हे त्यांच्या मोठेपणाचे प्रतीक होते.
अजितदादांच्या प्रेरणेमुळे तांदूळवाडी व हद्दवाढ क्षेत्रात पाच हजारांहून अधिक वृक्ष लागवड, महा रक्तदान शिबिरे, काशी यात्रा आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे भाग्य लाभले. त्यांनी दिलेली संधी हीच माझ्या सार्वजनिक जीवनाची खरी ताकद ठरली.
कार्यकर्त्याला कायमच ताकद देण्याचा प्रयत्न अजितदादा करत असत. कितीही छोटा कार्यकर्ता असला आणि तो काम करत असेल तर दादा त्याला कधीच विसरत नसत. अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत. प्रसंग कोणताही आला तरी त्याला मदतीची त्यांची भूमिका कायमच होती, त्यामुळेच या राज्यात लाखो कार्यकर्ते दादांच्या एका शब्दावर काहीही करण्यास तयार असत. आपला कार्यकर्ता कायमच सर्वार्थाने कशी प्रगती करेल, यासाठी त्यांची कायम धडपड राहिली.
अजितदादांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांना घडविण्याची त्यांची वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात कायम स्मरणात राहील. त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com