उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे माझ्यासह माढा मतदारसंघाची खूप मोठी हानी झाली - आमदार अभिजीत पाटील
MDH26B05066
माढा : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करताना आमदार अभिजित पाटील व इतर मान्यवर.
---
अजित पवारांच्या निधनाने माढा मतदारसंघाची हानी
आमदार अभिजित पाटील; माढ्यात सर्वपक्षीय शोकसभेत श्रद्धांजली
सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. ३१ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे माझ्यासह संपूर्ण माढा मतदारसंघाची फार मोठी हानी झाली आहे, असे प्रतिपादन आमदार अभिजित पाटील यांनी माढा शहरात आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत केले.
आमदार पाटील म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून झोपणारा आणि पहाटे त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कामाला लागणारा नेता म्हणजे अजित पवार. वेळेचे काटेकोर नियोजन, शिस्त आणि निर्णयक्षमता यांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रात विकासाचा दरारा निर्माण केला. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देश स्तब्ध झाला असून, आम्हा सर्वांवर दुःखाची छाया पसरली आहे. ही अपरिमित हानी आहे.
यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या शोकसभेस नगराध्यक्षा मीनल साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, राजाभाऊ चवरे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, आनंद कानडे, संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप, शहाजी साठे, दिनेश जगदाळे, ज्योती कुलकर्णी, विद्या शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

