ताकद असल्याने अजित पवार खडकवासल्यात घालणार लक्ष

उमेश घोंगडे
रविवार, 21 जुलै 2019

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद मोठी आहे. मात्र, या मतदारसंघाला फाटाफुटीचा शाप आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद असूनही विरोधकांना आमदारकीची संधी मिळत असल्याचा गेल्या तीन निवडणुकीमधला अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षाचे नेते अजित पवार या मतदारसंघात विशेष लक्ष घालणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्या राज्य समितीसमोर नुकत्याच मुंबईत झाल्या. यानंतर दोन दिवसांपूर्वी पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेऊन शहरातील आठ मतदारसंघांचा आढावा घेतला. खडकवासला मतदारसंघातून सात जणांनी उमेदवारीसाठी मुंबईच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली होती. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कांचन कुल यांना 62 हजार मतांचे अधिक्‍य होते. लोकसभेसाठीचे हे अधिक्‍य असले तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. साऱ्या इच्छुकांची ताकद एकत्र केली तर, राष्ट्रवादीचा आमदार निश्‍चितपणे निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत कुणा एकाला उमेदवारी मिळाल्यानंतर इतर सर्वजण विरोध करतात किंवा निष्क्रिय राहतात. परिणामी विरोधकांचा संधी मिळते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Look After Khadakwasla in assembly Election