बारामती नगरपरिषद उभारणार अजितदादांचे भव्य स्मारक

बारामती नगरपरिषद उभारणार अजितदादांचे भव्य स्मारक
Published on

बारामती, ता. २३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक उभारण्याच्या विषयाला बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता. २३) एकमताने मंजुरी देण्यात आली.
बारामतीतील प्रशासकीय भवनाशेजारील जागेत तीन मजली म्युझियम उभारून यात अजितदादांना मिळालेल्या वस्तू ठेवल्या जाणार आहेत. या शिवाय अजित पवार यांचा सर्वात जवळचा विषय असलेल्या जनता दरबाराची प्रतिकृतीही येथे साकारली जाणार आहे. अजित पवार यांच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतचा त्यांचा जीवनपट दृकश्राव्य माध्यमातून येथे उलगडला जाणार आहे. अजित पवार यांचे स्मारक उभारताना ५० मीटर उंचीचा मनोरा उभारला जाणार असून, त्यावरून बारामतीचा सर्वांगिण विकास अनुभवता येईल. या स्मारकस्तंभाची उंची बारामतीतील सर्वाधिक असेल, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.
बारामतीत येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळावी आणि अजितदादांचे काम भावी पिढीलाही माहिती व्हावे, यासाठी अत्यंत भव्य असे हे स्मारक उभारण्याचा निर्णय बारामती नगरपरिषदेने घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार व जय पवार या कुटुंबियांशी चर्चा विनिमय करून या स्मारकाला अंतिम रुप दिले जाणार आहे. अजित पवार यांचे स्मारक हा सर्वच बारामतीकरांसाठी भावनिक विषय असून, त्याला तातडीने मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतील, अशी ग्वाही सचिन सातव यांनी सभागृहास दिली. उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक या बैठकीस उपस्थित होते.
दरम्यान, स्वच्छता हा अजित पवार यांचा आवडता विषय होता. त्यामुळे त्यांचा स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतचा पुतळा व्हावा, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरु करावी तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची शिफारस नगरपरिषदेने राज्य शासनाकडे करावी, अशा सूचना विविध नगरसेवकांनी केल्या.

असे असणार स्मारक
- बारामतीतील प्रशासकीय भवनाशेजारील जागेत तीन मजली म्युझियम उभारणार. त्यात अजित पवार यांना मिळालेल्या वस्तू ठेवणार.
- अजित पवार यांच्या जनता दरबाराची प्रतिकृती साकारणार.
- अजित पवार यांच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतचा त्यांचा जीवनपट दृकश्राव्य माध्यमातून उलगडणार.
- ५० मीटर उंचीचा मनोरा उभारणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Atharv Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Grand memorial for Ajit Pawar in Baramati city
Marathi News Esakal
www.esakal.com