दुसऱ्या दिवशी ही बाजारपेठा बंद

दुसऱ्या दिवशी ही बाजारपेठा बंद
Published on

नातेपुतेत दुसऱ्या दिवशीही बाजारपेठा बंद
नातेपुते : बुधवारी (ता. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण माळशिरस तालुक्यात शोककळा पसरली आहे. नातेपुते शहरात बुधवारी आठवडा बाजार असतो, तरीही वाऱ्याच्या वेगाने ही बातमी समजताच अनेकांनी आपले व्यवहार बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी बारामतीकडे धाव घेतली होती. गुरुवारी (ता. २९) कुणीही बंदचे आवाहन केले नसतानाही संपूर्ण नातेपुतेतील बाजारपेठा ठप्प होत्या. बहुतेक घरातील कर्ती माणसे, आबालवृद्ध अजित पवारांच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसून होते. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट व शांतता पसरली होती. येथील अनेक मुले बारामतीला शिक्षणासाठी असल्याने बारामतीशी दररोजचा संपर्क आहे. अनेक कुटुंबांतील लोक अंत्यसंस्कारासाठी बारामतीला गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com