पिंपरी : हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नैसर्गिक नाल्यांमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे ही पूरस्थितीची मुख्य कारणे आहेत. त्यामुळे अशा बांधकामांवर त्वरित कारवाई करण्यात यावी..नाल्याचा प्रवाह बदलणारी, अडथळा निर्माण करणारी अनधिकृत बांधकामे त्वरित हटवावीत, प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए, एमआयडीसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना रविवारी (ता. १३) दिला. ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी कार्यालयातील बैठकीत दिले. .हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि काही दिवसांपूर्वी पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी रविवारी आयटी पार्क परिसरातील १५ ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते..या वेळी आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, ‘पीएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सहपोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, मुख्य अभियंता रिनाज पठाण आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, ‘‘नैसर्गिक ओढे व नाल्यांभोवती अतिक्रमण करण्यात आले आहे. नाल्याचा प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर तातडीने कठोर कारवाई करावी..या भागातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी रस्ते रुंद करत विनाअडथळा वाहतूक सुरळीत होईल, अशा उपाययोजना कराव्यात. हिंजवडी, माण, मारुंजीसह शहर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी नवीन रस्त्यांची आखणी तसेच रस्ते मोठे करणे अपेक्षित आहेत. त्याचा आराखडा तयार करून सविस्तर अहवाल सादर करावा, कारवाई करताना कोणी अडथळा निर्माण करत असेल तर अशांवर कलम ३५३ अंतर्गत कारवाई करावी, असे आदेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले..अजित पवार यांचे आदेश... पुणे मेट्रो लाइन ३ च्या कामाला गती द्यावी नाल्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी नाल्याचा प्रवाह कोणी बदलला, चौकशीसह कारवाई करावी नाल्यावरील अतिक्रमण त्वरित हटवावे बांधकामामुळे कोंडलेले नाले प्रवाहित करावेत ज्या भागात कचरा साचला आहे, तो तत्काळ उचलावाअधिकृत बांधकामांचा नाल्यास अडथळा ठरत असेल तर मार्ग काढावा हिंजवडी परिसरातील नवीन रस्त्यांचा आराखडा तयार करावा नाल्यातील बांधकामांना कोणी परवानगी दिली हे तपासावे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे माण देवीच्या मंदिरालगत ओढ्यावरील अतिक्रमण जिल्हा परिषदेने त्वरित हटवावे लक्ष्मी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी रिंगरोड वनजमिनीच्या प्रस्तावाबाबत प्राधान्याने काम करावे पाटबंधारे विभागानेसुद्धा याचा अहवाल द्यावा.दबावाला बळी पडणार नाही ः म्हसे हिंजवडी आयटी परिसरातील पूर निवारणासाठी टंडन असोसिएट संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. महिनाभरात त्याचा अहवाल सादर होईल. नाल्यामध्ये अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी नाला वळविण्यात आला, त्याचा प्रवाह सुरळीत करण्यात येणार आहे. महिनाभरात पन्नास मशिन्स आणि मोठ्या मनुष्यबळाच्या साहाय्याने कारवाई केली जाईल. कोणाचाही दबाव आला तरी त्याला बळी पडणार नाही, अशी माहिती ‘पीएमआरडीए’ महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली..Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार.विभागीय आयुक्तांची सुप्रिया सुळे आज भेट घेणार हिंजवडीतील विविध पायाभूत सुविधा सोडविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (ता. १४) विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील विधान भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत सुप्रिया सुळे हिंजवडीतील पायाभूत समस्या व प्रश्न आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना याचा आढावा घेणार आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.