
तळेगाव दाभाडे : ‘‘कुंडमळा येथील अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येईल. याशिवाय कालबाह्य झालेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील’’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच कुंडमळा येथील पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.