Ajit Pawar : महाराष्ट्रात विकास कामांच्याबाबतीत माझी स्वतंत्र कार्य़शैली आणि फॅशन; अजित पवार

पुणे जिल्ह्याचे एसपी कार्य़ालय नव्याने उभारण्याची घोषणा
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

माळेगाव : पुणे जिल्ह्याच्या जनतेसाठी सुरक्षिता आणि जातीय सलोखा राखण्यासाठी मला  जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक (एसपी) कार्य़ालय देखणे उभारायचे आहे. बारामती, माळेगाव, सुपे अशा अनेक ठिकाणी तालुकास्तरावरील पोलिस ठाणे अद्ययावत झाली. परंतु एसपींचे कार्य़ालय अद्याप झाले नसल्याची खंत आहे.

वित्तमंत्री म्हणून मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणिवस यांनी या कामात लक्ष घातले आहे. यापुढील जिल्ह्याला अभिमान वाटेल असे एसपींचे कार्यालय होईल, अशी महत्वपुर्ण माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात स्पष्ट केली. महाराष्ट्रात विकास कामांच्याबाबतीत माझी स्वतंत्र कार्य़शैली आणि फॅशन आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये सुमारे अडीच कोठी रुपये खर्च करून नव्याने उभारलेल्या माळेगाव पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी त्यांनी एसी कार्य़ालय उभारणीचा महत्वपुर्ण निर्णय पवार जाहिर केला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधिक्षक अंकित गोयल, माळेगावच्या मुख्याधिकारी स्मीता काळे,

अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक किरण अवचर, बप्पा बहिर, अनिल ढेपे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांच्या हस्ते डाॅ,संतोष भोसले यांनी  जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राला (माळेगावसह)  १२५ संगणक मोफत उपलब्ध करून दिले.

तोच धागा पकडत पवार म्हणाले, `` बारामती शहरा नंतर आता माळेगाव नगरपंचायतीचा नियोजनबद्ध सर्वांगिण विकास होऊ पाहत आहे. हा शाश्वत विकास  आणि लोकांची सुरक्षिता उत्तम राहण्यासाठी खरेतर पोलिस खात्याने प्रय़त्न केले पाहिजेत. पोलिसांना कार्य़ालय, राहण्यासाठी घरे, 

गाड्या, सीसीटीव्ही अशा अधिकाधिक सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनस्तराव प्रय़त्न  आहे. परंतु माझ्या बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या होताना वाइट वाटते. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्षमता वाढवावी आणि आमच्या आयाबहिणींना व नागरिकांना सुरक्षित ठेवावे.`` यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात हिरवाई आणि गार्डनला अर्थिक मदत केलेले रविंद्र काळे यांचेही अजित पवार यांनी अभिनंदन केले.  

अजितदादांच्या गाडीवर चढले कार्य़कर्ते...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगावात इंट्री होताच राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांनी व गावकऱ्यांनी एकच जल्लोश केला. यावेळी फटाक्यांची अतषबाजी, घोषणाबाजी आणि क्रेनच्या सहाय्याने उभारलेले भले मोठे हार पाहून अजित पवार अक्षरशः भारावले.

काहींनी तर चक्क अजित पवार यांच्या गाडीच्या बाॅनेकटवर चढून त्यांना हार घालण्याचा प्रयत्न केला. दादांनीही न रागवता हासत मुखाने आणि दुलखुलासपणे पोझ देत त्या कार्य़कर्त्यांचे हार स्वीकारले, हे विशेष होय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com