पिंपरी चिंचवड शहरासह भोसरीचा विकासपुरुष हरवला

पिंपरी चिंचवड शहरासह भोसरीचा विकासपुरुष हरवला

Published on

भोसरी, ता. ३ : ‘‘अजितदादांच्या निधनाने विकासाला प्राधान्य देणारा, पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसराचा विकासपुरुष हरवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ देणे हीच उपमुख्यमंत्री अजित पवार खरी श्रद्धांजली ठरेल,’’ अशा भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भोसरी येथे आयोजित शोकसभेत व्यक्त केल्या.

अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत माजी आमदार विलास लांडे, नगरसेविका भीमाबाई फुगे, नगरसेवक विराज लांडे, तुषार सहाणे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, पंडित गवळी, सखाराम डोळस, दत्तोबा लांडगे, विजय फुगे, निवृत्ती शिंदे, प्रियांका बारसे, सुरेखा लोंढे, नंदकुमार शिंदे आदींसह उपस्थितांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या वेळी सतीश फुगे, अमोल डोळस, पवन गुंजाळ, सम्राट फुगे, अभिराज गव्हाणे, सूरज लांडगे, निता कांबळे, किरण डोळस, भानुदास फुगे, अश्विनी फुगे, अनुराधा लांडगे आदिंनीही श्रद्धांजली वाहिली.

माजी आमदार लांडे म्हणाले, ‘‘अजित पवार हे खऱ्या अर्थाने शहराचे शिल्पकार आहेत. त्यांनी शेवटपर्यंत शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा जपला. महिलांनी आता पुढे येऊन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना खंबीरपणे पाठिंबा देण्याची गरज आहे.’’

लोंढे म्हणाले, ‘‘भोसरीत पूर्वी शहराचा कचरा गोळा होत असल्याने या भागाला कचरा डेपोची ओळख मिळाली होती. मात्र, पवार यांनी लक्ष घालून परिसराचा कायापालट केला आणि जुनी ओळख पुसली. शब्दाला जागणारा नेता आपण गमावला आहे.’’

गवळी म्हणाले, ‘‘पवार यांनी जातीपातीचे राजकारण न करता कार्यकर्त्यांना बळ दिले. भोसरीच्या विकासासाठी महापालिकेत येथील नेत्यांना विविध पदे दिली. त्यांनी केलेला विकास विरोधकही मान्य करतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com