

Tragic Plane Crashes That Took Political Leaders Across India Like Ajit Pawar
Sakal
Ajit Pawar Dead: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुःखद निधन झालं आहे. बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते जात होते तेव्हा विमानतळावर लँड होण्यापूर्वी समोरचा मार्ग स्पष्ट न दिसल्याने विमानाचा अपघात झाला. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कोणीही बचावले नाही. विमानात एक पायलट, एक क्रू मेंबर आणि तीन प्रवासी होते.
मात्र असा अपघात भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच झालाय असं नाही. भारतात आतापर्यंत अनेक नेत्यांनी विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांत आपले प्राण गमावले आहेत. अशा दुर्घटनांनी फक्त राजकारणच नाही तर संपूर्ण देश हादरुन जातो. त्याचमुळे अजित पवारांच्या विमान अपघाती निधनामुळे पुन्हा एकदा देशातील पूर्वीच्या हवाई दुर्घटनांची आठवण ताजी झाली आहे.