Ajit Pawar Plane Crash : विमान उतरताना वेग ताशी २६० किमी, इंधन १.१२ टन; अखेरच्या १५ मिनिटात काय घडलं?

Ajit Pawar Death in Plane Crash : विमान उतरविण्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नातही वैमानिकाला धावपट्टी नीट दिसली नाही. त्यावेळी विमान पुन्हा वर नेत असताना ही दुर्घटना घडली.
Ajit Pawar plane crash landing attempt failed last 15 minutes details emerge

Ajit Pawar plane crash landing attempt failed last 15 minutes details emerge

Esakal

Updated on

पुणे, ता. २८: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाच्या धावपट्टीपासून सुमारे १०० फूट उंचीवर व ५० फूट अंतरावर असताना विमानाचा अपघात झाला. धावपट्टी क्रमांक ११ च्या बाजूने विमान उतरविण्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर वैमानिकाने १२ मिनिटांनी दुसरा प्रयत्न केला. मात्र या वेळी विमानाचा वेग ताशी २६० किलोमीटर इतका होता. दुसऱ्या प्रयत्नातही वैमानिकाला धावपट्टी नीट दिसली नाही. त्या वेळी शेवटच्या क्षणी विमान उतरवणे रद्द करीत पुन्हा ते वेगाने वर नेण्याचा प्रयत्न झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com