

rohit pawar
sakal
पुणे - ‘बारामती येथील विमान अपघात प्रकरणात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अहवालानुसार व्हीएसआर विमान कंपनीला जबाबदार ठरविण्यात आले आहे. त्याआधारे आम्ही मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली; मात्र ती स्वीकारली नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत,’ असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.