ajit pawar
sakal
पुणे - 'महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, वाढलेले प्रदूषण, नाट्यगृहांची दुरवस्था, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची अर्धवट कामे, कचऱ्याची विल्हेवाट व पिण्याचे पाण्याची समस्या, अशा प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ पुणेकरांवर आली. पाच वर्षात विकासकामांसाठी ११३० कोटी रुपयांची तरतूद होती, मात्र महापालिकेने त्यापैकी केवळ ८५८ कोटी रुपये खर्च केले, हे कारभाऱ्यांचे अपयश आहे.