

जयंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १७ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा सामना बघायला मिळाला होता. पुन्हा एकदा अशीच राजकीय परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. याला कारण आहे माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय कोलांटी उडीचे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी अजित पवार यांची साथ सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची भूमिका घेतली. यामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आघाडीवर होते. शहराध्यक्ष गव्हाणे २० नगरसेवकांसह अजित पवार यांच्यापासून दूर गेले.