पुण्यात आता कडक निर्बंध; वाचा नवीन नियमावली

ajit pawar
ajit pawar

पुणे -  पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात असून सक्रीय रुग्णांची संख्या 50 हजारांजवळ पोहोचली आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात सक्रीय रुग्ण 49 हजार 710 इतके होते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रुग्णसंख्या कमी झाली नाही तर पुढच्या शुक्रवारी आम्ही कठोर निर्णय़ घेऊ असे अजित पवार यांनी सांगितलं. ग्रामीण भागात सुविधा वाढवण्याचा निर्णय. दरम्यान, आता दहावी बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्या बोर्डाच्या नियमानुसार होतील. याकाळात पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची असणार आहे असंही अजित पवार म्हणाले. 

कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली असून नाईलाजाने कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जे नियम आहेत ते पाळा असं आवाहन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर बंधनकारक आहे. कोरोनाची पहिली लाट होती तेव्हा जी भीती होती ती आता राहिलेली नाही. लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका बसला असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

काय असतील नियम - 

  • बोर्डाच्या परीक्षा नियमानुसार होतील
  • रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय आधीसारखाच
  • लग्न 50 पेक्षा जास्त संख्या नको
  • अंत्यविधीची कार्यक्रम 20 लोक असावेत
  • शाळा महाविद्यालये बंद राहणार 
  • सार्वजनिक उद्यानं सकाळीच सुरु राहतील
  • मॉल्स, मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहांत 50 टक्के उपस्थिती
  • सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
  • सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी
  • पंचायतीपासून संसदेपर्यंत असणारे प्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम बंद करावेत

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय बंद राहणार?

  • शाळा, महाविद्यालये (दहावी, बारावीचा अपवाद वगळता).
  • शहरातील सार्वजनिक उद्याने (गार्डन्स). (फक्त रोज सायंकाळी)
  • गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्लब हाऊसेस. (पुढील आदेशापर्यंत)
  • रात्री १० वाजण्याच्या पुढे दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट.
  • मोठे लग्न समारंभ, सभा, सार्वजनिक कार्यक्रम.
  • रात्री १० वाजण्याच्या पुढे मॉल्स, चित्रपटगृहे.
  • रात्री १० वाजण्याच्या पुढे रस्त्याच्या कडेवरील स्टॉल्स.

काय बंद राहणार?

  • दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट (रात्री दहा वाजेपर्यंत).
  • हॉटेलमधून जेवणाचे पार्सल नेणे (फक्त रात्री १० ते ११ या वेळेत)
  • सार्वजनिक उद्याने सकाळी ६ ते १० या वेळेत चालू राहणार.
  • लग्न, अंत्यविधी व अन्य समारंभ (लग्नासाठी कमाल फक्त ५० व अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची उपस्थिती अनिवार्य).
  • अभ्यासिका निम्म्या क्षमतेने.
  • आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा.
  • रस्त्याच्या कडेवरील स्टॉल्स (रात्री १० वाजेपर्यंत).
  • सार्वजनिक वाहतूक (निम्म्या क्षमतेने).

औरंगाबादमध्ये 100 लोकांची चाचणी तर 48 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. पिंपरीत हेच प्रमाण 40 टक्क्यापर्यंत पॉझिटिव्ह आढळले होते. आता ते कमी आहे. नियमांचे पालन केलं नाही तर एक एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल. जर काहीच फरक पडला नाही तर 2 एप्रिलपासून कठोर निर्णय़ लागू करण्याची वेळ येऊ शकते असं म्हणत लॉकडाऊनचे संकेत अजित पवार यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com