Ajit Pawar : प्रसंगी वाईटपणा स्विकारुन पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार

अजित पवार म्हणाले, पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे, आता मात्र मी व देवेंद्र फडणवीस यांनी वाईटपणा स्विकारुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

बारामती - वेळप्रसंगी थोडा वाईटपणा स्विकारुन पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय मी व देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित व्यापारी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, महासंघाचे संस्थापक नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष सुशील सोमाणी, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, किशोरकुमार शहा, जगदीश पंजाबी, प्रवीण आहुजा, सुरेंद्र मुथा, संतोष टाटीया, संभाजी किर्वे, शैलेश साळुंके, फखरुद्दीन कायमखानी आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे, आता मात्र मी व देवेंद्र फडणवीस यांनी वाईटपणा स्विकारुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले आहे. दोन धावपट्ट्या व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे असा आमचा प्रयत्न आहे.

बारामतीच्या विमानतळावरही नाईट लँडींगची सुविधा करण्याचा विचार आहे. येथील जागेचा विचार करता मोठी विमाने उतरणे अवघड आहे, पण किमान नाईट लॅंडीग तरी करणे शक्य आहे. रिलायन्स कंपनीला सरकारने नोटीस पाठवली असून शासनाकडे विमानतळ आल्यानंतर त्याचा विकास केला जाईल.

नरेंद्र मोदींचे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे स्वप्न आहे, राज्याची अर्थव्यवस्था त्यात एक कोटी ट्रिलियनचा हिस्सा उचलेल या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील आहे.

सुशील सोमाणी यांनी विविध विषयांची माहिती दिली. या प्रसंगी नरेंद्र गुजराथी, सुभाष सोमाणी, संभाजी किर्वे, प्रवीण आहुजा, स्वप्निल मुथा यांनी मनोगत व्यक्त केले. जगदीश पंजाबी यांनी प्रास्ताविक केले.

दादांचा गुढीपाडव्याला स्नेहमेळावा....

बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अजित पवार यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्याचा प्रस्ताव अजित पवार यांनी मान्य केला. या पुढे बारामतीत गुढीपाडव्याला अजित पवार आगामी वर्षातील आर्थिक धोरणांबाबत व्यापा-यांना मार्गदर्शन करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com