पुणे - ‘आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत, जनतेला न्याय देण्यासाठी. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही. आम्ही एकोप्याने कारभार करत आहोत. मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या व्यासपीठावर मते मांडावीत, समाजात गैरसमज पसरवू नयेत. कधी कधी भांड्याला भांड लागते, पण आम्ही त्यातून मार्ग काढू,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले.