Ajit Pawar : पंतप्रधान मोदी जगातील लोकप्रिय नेते - अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेते असून, विकास पुरुष म्हणून ओळखले जात आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sakal

बावडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेते असून, विकास पुरुष म्हणून ओळखले जात आहेत. पंतप्रधान मोदी हे नेहमी विकासाला महत्त्व देत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सुनेत्रा पवार यांना भरघोस मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बावडा येथे शुक्रवारी (दि.4) केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजितदादा पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्याच्या खासदारांनी पंधरा वर्षे प्रवाहाच्या विरोधात काम केले, त्यामुळे त्यांनी मतदारसंघात कुठलीच कामे केली नाही.

सध्याच्या खासदार ह्या मोदी व शहा यांच्या विरोधात बोलायच्या, त्यामुळे त्यांना निधी कसा मिळणार? मोदींच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या सुनेत्रा पवार यांना निवडून द्या व निधी बाबत बिनधास्त रहा.

हर्षवर्धन पाटील व आम्ही विकास कामांसाठी एकत्र आलो आहोत. आचारसंहिता संपताच आंम्ही बैठक घेऊन विकासकामे मार्गी लावू. त्यामुळे जनतेने विकास कामासंदर्भात अजिबात काळजी करू नये, असे भाषणात अजित पवार यांनी नमूद केले.

इंदापूर तालुक्यातील निरा डावा कालव्याखालील बावीस गावाचा प्रश्न, खडकवासला कालवा, निरा व भीमा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये वर्षभर पाणीसाठा करणे, दोन्ही नदींवरील बंधार्‍यांची दुरुस्ती, भीमा नदीवर बुडीत बंधारे बांधणे, शेटफळ तलाव प्रत्येक वर्षी भरून घेणे, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारणे आदि प्रश्नांसंदर्भात मार्ग काढला जाईल, असे भाषणात अजितदादा पवार यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न, बेरोजगारी कमी करणे, शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक सुविधा चालु करणे यासाठी इंदापूर तालुक्यात विकासाचे नवे पूर्व सुरू करण्यासाठी मी व अजितदादा एकत्र आलो आहोत.

अमित शाह यांचेशी माझे व अजितदादांचे चांगले जमते. त्यामुळे केंद्राकडून निधी येण्यास अडचण येणार नाही. त्यासाठी सुनेत्रा पवार यांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवा, असे आवाहन भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना आ. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, तालुक्यातील पाणी प्रश्न व इतर प्रश्न आंम्ही व हर्षवर्धन पाटील एकत्रपणे सोडवू. कार्यकर्त्यांनी गमतीजमती न करता, एकदिलाने सुनेत्रा पवार यांना मताधिक्य द्यावे, असे आवाहनही भाषणात दत्तात्रय भरणे यांनी केले.

प्रास्ताविक नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी केले. यावेळी प्रशांत पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांची भाषणे झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रवीण माने, राजवर्धन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार आदींसह भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी पंचायत समिती सदस्य सुरेश मेहेर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com