
पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीतील शेतकऱ्यांनी सभेत गोंधळ घातला. ‘कर्जमाफी कुठे आहे?’, ‘शेतकरी अजूनही अडचणीत!’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. हा गोंधळ इतका तीव्र होता की, काही काळासाठी कार्यक्रम थांबवावा लागला. या घटनेने पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.