Ajit Pawar : दबावाला बळी न पडण्याची पत्रकारांची परंपरा कायम राहण्याचा विश्वास; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar statement Believing journalistic tradition of not succumbing to pressure pune

Ajit Pawar : दबावाला बळी न पडण्याची पत्रकारांची परंपरा कायम राहण्याचा विश्वास; अजित पवार

हडपसर : "राजकारण असो किंवा समाजकारण, ते साधत असताना माणूस म्हणून आपण सगळेजण कुठेतरी कधीतरी चुकतो किंवा कमी पडतो. त्यातील खरे आणि योग्य ते समाजासमोर आणून वस्तुस्थिती दाखवत योग्य सल्ला देण्याची पत्रकारितेची परंपरा आजही कायम आहे.

या संदर्भाने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. कुणाच्याही दबावाला बळी न पडता ही परंपरा त्यामुळे यापुढेही कायम राहील हा विश्वास वाटतो, असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त विविध वृत्तपत्रे व माध्यमांत काम करणाऱ्या हडपसर परिसरातील पत्रकारांचा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पत्रकार कृष्णकांत कोबल, सुधीर मेथेकर, अशोक बालगुडे, अनिल मोरे, दीपक वाघमारे, प्रमोद गिरी, विवेकानंद काटमोरे, तुषार पायगुडे, जयवंत गंधाले, दिगंबर माने, अमित मेहंदळे, वसंत वाघमारे, रागिनी सोनवणे यांचा यावेळी सत्कार झाला.

आमदार चेतन तुपे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर, सुनील गायकवाड, योगेश ससाणे, हेमलता मगर, प्रवीण तुपे, प्रताप पवार, शिवाजी पवार, अजित घुले, जितीन कांबळे,

प्रशांत पवार, पल्लवी सुरसे, सुधा हरपळे, प्रतिमा तुपे, सविता मोरे, विक्रम जाधव, मंगेश मोरे, संजय हरपळे, सुहास खुटवड, प्रशांत सुरसे, रूपेश तुपे, अविनाश काळे, सुधीर घुले आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. शंतनू जगदाळे, अमर तुपे, संदीप बधे, स्वप्नील धर्मे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.