
पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनी मंगळवारी शिवबंधनातून मुक्त होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच माजी उपमहापौर बंडू गायकवाड, माजी नगरसेवक नीलेश मगर, योगेश ससाणे, हेमलता मगर आणि स्वीकृत नगरसेवक अजित ससाणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.