पुणे - भाजप सरकार आल्यानंतर लोकशाहीविरोधी कारभार सुरू आहे. दुसऱ्या पक्षातील तयार झालेले नेते आपल्या पक्षात घ्यायचे. दुसऱ्यांची मुले आपल्या मांडीवर खेळवण्यासारखा हा प्रकार आहे. .अजित पवार यांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील सत्तर हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची भाषा करतात. अजित पवार यांची सत्तेत घुसमट होत असून, त्यांना बाहेर पडायचे असल्यास त्यांना मदत करू, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी पुण्यात केले..पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जनता वसाहत येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांच्यासह उमेदवार, नेते गजानन थरकुडे उपस्थित होते..जाधव म्हणाले, ‘सत्तेसाठी भाजप अगदी एमआयएम, काँग्रेससमवेतही आघाडी करतो. भ्रष्ट नेत्यांना वॉशिंग मशिनची कमाल दाखवून पक्षात घेतले. विविध नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले. लोकशाही वाचविण्यासाठी भाजपची दादागिरी संपवली पाहिजे. कारण, भाजपने विरोधकांचा बळी घेतला. या पार्श्वभूमीवर लोकशाही आणि निष्ठेचे तत्त्व जपण्यासाठी भाजपविरोधात महाविकास आघाडीला पाठबळ द्या.’.एकेकाळी शांत, सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गुंडांचे, लुटारूंचे आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे होत आहे. या पुण्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी भाजपविरोधात सर्व विरोधकांनी मतभेद विसरून एकत्रित यावे, असे आवाहनही त्यांनी केले..केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप अजित पवार करत आहेत. मात्र पालकमंत्री, उपमुख्यमंत्री असताना तुम्ही आधीच का चावी फिरवली नाही. आता उशिरा जाग आली का? असा प्रश्न सचिन अहीर यांनी केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.